Saturday, November 26, 2011

Shree Sai Baba Of Shirdi


सन १८१८ नंतरच्या काळात व्यापारासाठी आलेला हा गोरा फिरंगी भारताचा सार्वभौम स्वामी बनला. अनादी काळापासून चालत आलेल्या ,जपलेल्या आपल्या परंपरेवरच त्याने प्रथम वार केला. एक अत्यंत सबळ राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतभूमीला पारतंत्र्याच्या,लाचारीच्या अंधारात खितपत  लागले.  एकीकडे गरिबी व अशिक्षिततेच्या विहिरीत राष्ट्राला झोकून देशवासियांना परावलंबी  बनवले व दुसरीकडे  गुरु-शिष्य परंपरेसारख्या दैदिप्यमान  शिक्षणप्रणालीला संपवून नवी नोकरशाही पाश्चिमात्य शिक्षणप्रणाली अवलंबायला लावली ज्याने माणूस कितीही हुशार का असेना पण शेवटी इंग्लंडच्या राणीचा नोकर म्हणूनच  नावारूपाला येईल. जातीवाद व धर्मवाद ह्या दोन जात्याच्या चक्राखाली भारतीय दळले -पोळले लागले.

अशा वेळी रंजल्या- गांजल्या समाजाला शारीरिक-मानसिक व अध्यात्मिक दृष्ट्या सबळ बनविण्यासाठी व त्यांच्यात राष्ट्रप्रेम ,स्वधर्माचा व राष्ट्रधर्माचा पुनः कानमंत्र फुंकण्यासाठी देवालाही आता परत अवतरित व्हायलाच हवे होते. सोवळे-ओवळे , मूष्यद्वेष,स्वार्थ-दुराचार, व  चुकीचे धर्माचरण  करीत असलेल्या इथल्या मनुष्यांना  ग्यान व भक्तीचा मार्ग दाखविण्याकरिता कलियुगात दत्तगुरूंनी वेळोवेळी अनेक अवतार घेतले.

शिर्डीत आगमन

सन 1852 साली जेव्हा साईबाबा बालयोगी रूपाने शिर्डीत प्रकटले त्या वेळेस ते तेथील एक कडुनिंब वृक्षाखाली बसत. अनेकांनी त्या वेळेस त्यांना तिथेच का बसता? असे विचारले. त्यावेळेस बालयोगी उद्गारला- " हे माझ्या गुरूंचे स्थान आहे. इथेच मी माझ्या गुरूंबरोबर बारा वर्षे राहिलो आणि तपश्चर्या केली." 
हे उत्तर शिर्डीतील ग्रामस्थांना पटणारे नव्हते. म्हणूनच एकदा खंडोबाच्या मंदिरात देवाचा अवसर आला असता लोकांनी बालयोग्याच्या वक्तव्याची शहानिशा करण्याच्या हेतूने देवाला याबद्दल विचारले. खंडोबाच्या अवसराने निंबवृक्षाखालील जागेची खणती लावल्यानेच याचे उत्तर मिळेल असे सांगितले. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी निंबाखालची जमीन खणली असता खाली त्यांना एक सपाट दगड सापडला व काही वीट लावलेले सापडले. 
दगड बाजूला सारला असता त्यांना खाली एक भुयार दिसले व भुयारात एक छोटासा कक्ष सापडला ज्यामध्ये चार पणत्या अखंड तेवत असलेल्या दिसल्या. जवळच बसण्याची आसने व जपमाळ दिसली.आशा तर्हेने ग्रामस्थांना बालयोग्याच्या वक्तव्याची खात्री पटली.पुढे काही वर्षांनी चांद पाटलाच्या पुतण्याच्या वरातीबरोबर शिर्डीत पुनरागमन केल्यानंतर बाबांनी शिर्डीतच राहण्याचा निश्चय केला. चांद पाटलाने वारंवार त्यांना आपल्याबरोबर परतण्यासाठी विनवणी केली असता बाबा म्हणाले- "चांद, शिर्डी मेरी कर्मभूमी हैं। मुझे साथ ले जाना हैं तो आपने दिल में ले जाओ।"
यानंतर बाबांचे वास्तव्य एक तर गावच्या मारुतीच्या मंदिरात असे अथवा ह्याच निंब वृक्षाखाली असे.

Akkalkot Niwasi Shree Swami Samarth Maharaj


Shree Narsimha Saraswati Swami Maharaj


Swami Shripad Shrivallabh


Shree Gurudev Datt